आता कैद्यांनाही मिळणार कर्ज, येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर योजना राबवणार

88 0

मुंबई- कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा व त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. देशामध्ये अशाप्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून पहिलीच योजना असणार आहे. कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घमुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्याने अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरूंगात रहावे लागल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबीयांमध्ये औदासिन्य, नैराश्य, अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ शकते.

अशा परिस्थितीत कैद्यास त्याच्या कुटुंबाच्या गरजेकरिता कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून दिल्यास कैद्याबद्दल कुटुंबीयांमध्ये सहानुभूती व प्रेम वाढून कुटुंबातील वातावरण सुदृढ राहण्यास मदत होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, त्यामधून त्याला मिळू शकणारी संभाव्य सूट, वय, वार्षिक कामाचे अंदाजित दिवस, प्रति दिवसाचे किमान उत्पन्न यानुसार प्रस्तुत कर्जसुविधा ठरविली जाईल. अशा प्रकारच्या कर्जाला जामीनदारांची आवश्यकता असणार नाही. हे कर्ज संबंधित बंद्याला विनातारण व केवळ व्यक्तीगत हमीवर देण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Share This News

Related Post

महिला मोर्चा कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Posted by - March 20, 2022 0
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा…

महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत पाटील

Posted by - May 4, 2022 0
कोल्हापुर- ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून शिवसेना – काँग्रेस –…

Breaking News ! दाढी कटिंग महागली ! सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ

Posted by - April 20, 2022 0
पुणे- सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी आपल्या सेवेमध्ये दरवाढ केली आहे. व्यावसायिकांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या…

ओटिटीवर मार्च महिन्यात वेबसिरीजचा मारा, असे आहे ओटीटीचे वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
मार्च महिन्यात सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीज यांचा मारा होणार आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील काही चांगले कंटेंट देखील…

चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात ह्या पाच गोष्टी खाणे टाळा

Posted by - April 2, 2022 0
उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच, जोरदार ऊन आणि गरम वारा यांनी लोक हैराण होऊन जातात. तापमानात वाढ झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आरोग्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!