खोटे मेसेज पाठवल्यास व्हॉट्सॲप अकाउंट होऊ शकते बंद; मेटाने काढले नवे नियम

95 0

भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर ॲप म्हणजेच व्हॉट्सॲप वापरलं जातं. मात्र व्हॉट्सॲपचा वापर करताना काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.WhatsApp वर मेसेज एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असतात, म्हणजे सेंडर आणि रिसिव्हर व्यतिरिक्त इतर कोणी ते वाचू शकत नाही. परंतु युजर्सनी शेयर केलेल्या लिंक्स आणि मीडियाचा डेटा मेटा कंपनी ट्रॅक करते.जर खोटे मेसेज पाठवण्यात आले तर तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं. मेटा कंपनीने युजरला कळवू न देता कारवाई केली जाऊ शकते असं व्हॉट्सॲपच्या अधिकृत वेबसाईटवरून स्पष्ट केलं आहे. त्यामुळं कोणत्या कारणांनी तुमचं अकाउंट बंद होऊ शकेल हे जाणून घ्या..

मेटाच्या नव्या नियमांमध्ये खोटे अथवा बनावट मेसेज पाठवणे व ते सातत्याने स्वीकारणेही अकाउंट बंद होण्यास कारणीभूत ठरू शकते.

1) कोणत्याही हेतूनं काही साधनांचा वापर करून व्हॉट्सॲपवरून मोठ्या प्रमाणात माहिती मिळवल्यास

2) व्हॉट्सॲप युजरचे फोन नंबर, प्रोफाईल फोटो, स्टेटस किंवा इतर माहिती मिळवल्यास कंपनीच्या सेवा अटींचं उल्लंघन ठरेल

3) व्हॉट्सॲपच्या सहाय्याने व्हायरस किंवा मेलवरील फाईल्स शेअर केल्यास असे व्हायरस युजरच्या डिव्हाईसला बाधा पोहोचवू शकतात

4) व्हॉट्सॲपवर बनावट अकाउंट तयार केल्यास किंवा इतर कोणाचं अकाउंट कॉपी केल्यास तुमचं अकाउंट बंद होऊ शकते

5) युजरच्या परवानगीशिवाय त्याचा नंबर तुम्ही कोणालाही शेअर करू शकत नाही.

6) एकाच वेळी ऑटोमॅटिक किंवा ऑटो डायल केल्यास तसे मेसेज करणारे शोधून काढण्यासाठी कंपनी ‘व्हॉट्सॲप मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी’ व संबंधित व्हॉट्सॲप अकाउंट युझर्सचा रिपोर्ट समोर ठेवणार

7) अनधिकृत पद्धतीने व्हॉट्सॲप अकाउंट किंवा ग्रुप तयार केल्यास व एकाहून अधिक ग्रुप तयार करण्यासाठी इतर ऑनलाईन साधनांचा वापर केल्यास

8) ब्रॉडकास्ट मेसेजची लिंक एखाद्या अकाउंटवर सतत शेअर केल्याची तक्रार केल्यास

9) एखाद्या खात्यावरून तुम्हाला सतत फेक मेसेज येत असतील तरी तुम्ही ते खाते ब्लॉक न केल्यास

10) व्हॉट्सॲप कोड बदलण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न केल्यास

जर तुम्ही या चुका केल्या तर तुमचं अकाउंट बंद होऊ शकतं. त्यामुळं व्हॉट्सॲपचा वापर करताना काळजी घ्या. कुठल्याही फेक मेसेजला बळी पडू नका.

Share This News

Related Post

अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, CISF जवानांनी वाचवले प्राण (व्हिडिओ)

Posted by - April 14, 2022 0
नवी दिल्ली- दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे CISF जवानांनी प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना मोबाइलमध्ये…

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…

देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरतीये, 24 तासात 50 हजार 407 नवे कोरोनाबाधित, 804 जणांचा मृत्यू

Posted by - February 12, 2022 0
नवी दिल्ली- देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दैनंदिन कोरोनाबांधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून देशात…

युक्रेन रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावला अभिनेता सोनू सूद

Posted by - March 5, 2022 0
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध पाहता जग सध्या चिंतेत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेकांना युद्धाच्या काळात देशात अडकलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!