तिरुपती दर्शनानंतर पुण्यात आलेल्या वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…(व्हिडिओ)

87 0

पुणे- तिरुपती दर्शन घेऊन पुण्यात परतलेले मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण पक्ष पुण्यात होता. त्यामुळे पक्षाचे नेते असतील, नवीन शहराध्यक्ष असेल, एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कुणी लढाई हरत नाही.

तिरुपती बालाजी आणि त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन ते पुण्याला परतले. वसंत मोरे म्हणाले की, ठाण्याच्या सभेवेळी आदल्या दिवशी राज साहेबांनी मला बोलवून ठाण्यातील सभेला त्यांनी यायला सांगितले होते.त्याचवेळी माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम होता, पण मी त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता ठाण्याच्या सभेला गेलो. मी जर ठाण्याच्या सभेला गेलो नाही, तर संभ्रम निर्माण होईल, म्हणून मी तिथे गेलो. त्यामुळे मी मनसेत नाराज असल्याच्या चर्चेला काही अर्थ नाही.

सतरा – अठरा वर्ष झाली मी बालाजीच्या दर्शनाला दरवर्षी जात असतो. अक्षय्य तृतीयेच्या दरम्यानच जात असतो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे जाता आले नाही . मार्च – एप्रिलनंतर मी निवडून येईल आणि बालाजीला जाईन म्हणून जवळपास दीड महिने आधीच रिझर्वेशन केले होते. या काळामध्ये सगळे मनसे नेते संपर्कात होते असेही वसंत मोरे म्हणाले.

आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिले. वसंत मोरे म्हणाले, “स्वामी विवेकानंदांचे ते स्टेटस मला आवडते . ज्यावेळेला तुमचा संघर्ष होत असतो , निंदानालस्ती होत असते , ज्यावेळी तुम्हाला अडचणी येतात तेव्हा समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात”

Share This News

Related Post

गुलटेकडी भागात दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी

Posted by - April 1, 2022 0
पुणे- पुण्यातील गुलटेकडी परिसरात दोन महिलांमध्ये तुफान राडा झाला. तोंडाकडे पाहून थुंकल्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये झालेल्या हाणामारीत एका महिलेने दुसऱ्या…

पुणे महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रवादीचं घंटानाद आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
पुणे- पुण्यातील शिवाजीनगर भागात वारंवार पाणीपुरवठा खंडित होणं, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याच विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीनगर…

कोरोना लसीकरणाची कॉलर ट्यून तत्काळ बंद करा; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या वैश्विक महामारीचा सामना करत असताना मास्क, सॅनिटाझर, लसीकरण ही त्रिसुत्री कोरोना बचावापासून महत्त्वाची ठरली. मात्र…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॅबोरेटरीचे उद्घाटन

Posted by - April 18, 2022 0
पुणे- दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग व युथ फॉर जॉब फाऊंडेशन यांच्या…

निमित्त शिवजयंतीचे आणि बॅनरवर संभाजी महाराजांचा फोटो, सारथीचा अजब कारभार

Posted by - February 9, 2022 0
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 जयंती निमित्त सारथी संस्थेतर्फे ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या बॅनरवर करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!