ऊर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठक रद्द झाल्यानं वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

60 0

एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत आहे. त्यात आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय.

मात्र यावेळी हे संकट केवळ शहरी भागही कवेत घेण्याची शक्यता आहे. कारण वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण काल (सोमवारी) सुरू झालेला वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली.

पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. शिवाय आज (मंगळवारी) ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे.

वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News

Related Post

राज्यात ‘या’ दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची हवामान विभागाने वर्तवली शक्यता

Posted by - April 19, 2022 0
दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. भारतीय हवामान विभागाने सोमवारी…

‘राज’ गर्जना होणार! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी

Posted by - April 28, 2022 0
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही…

मुद्रांक शुल्काच्या दंडात सवलतीची योजना लागू; ३० नोव्हेंबरपर्यंत घेता येणार अभय योजनेचा लाभ

Posted by - April 25, 2022 0
मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या शास्तीमध्ये (दंड) सवलत देण्यासाठी राज्य शासनाने १ एप्रिल २०२२ च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना…

महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष…

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला पुन्हा धक्का ; नगरसेवक रवी लांडगे ,संजय नेवाळे यांचा राजीनामा

Posted by - March 9, 2022 0
मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड भाजप मध्ये भाजपाला जोरदार धक्के बसायला सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ चे रवी लांडगे आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!