‘जेष्ठ नागरीक रेल्वेभाडे सवलत’ बंद केल्याबाबत मोदी सरकारचा तीव्र निषेध- गोपाळ तिवारी

103 0

भारतीय रेल्वेद्वारे ५८ वर्षांवरील महिला आणि ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना केंद्र सरकार  रेल्वे भाड्यात सवलत देत असे. प्रवाशांना दिलेल्या ‘सवलतीचा बोजा’ भारतीय रेल्वेवर पडतो आहे, त्यामुळे ‘रेल्वे भाड्यातील सवलतीवरचे निर्बंध कायम राहतील’ आणि त्यांनाही इतर प्रवाशांप्रमाणे पूर्ण भाडे भरावे लागेल, असा निर्णय रेल्वेने घेतल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बुधवारी (दि १६ मार्च)सांगितले.

देशात २०२० मध्ये करोनाची लाट आली, तेव्हा सरकारने ‘प्रवासी रेल्वे सेवांवर’ बंदी घातली होती, मात्र पुन्हा काही काळानंतर सरकारने ‘रेल्वे – प्रवासी सेवा’ सुरू केल्यावर देखील ‘ज्येष्ठ नागरिकांना किंवा वृद्ध प्रवाशांना दिलेली रेल्वे भाड्यातील सूट बंद केली होती’.. या वर प्रश्न विचारला असता रेल्वेमंत्र्यांनी वरील उत्तर दिले…!

५ राज्यांच्या निवडणुकांनतर, मोदी सरकारने जेष्ठ नागरीकांचा एकप्रकारे विश्वासघात केला असुन, ‘जेष्ठ नागरीक रेल्वे भाडे सवलत’ बंद केल्याबद्दल मोदी सरकारचा तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगीतले..!

सर्वसामान्यांच्या ‘रेल्वे प्रवासात जेष्ठांना, वृध्दांना मिळणारी सवलत महत्वपुर्ण ठरत होती’ … त्यामुळे असंख्य सामान्य वृध्द व जेष्ठ नागरीक निवृत्ती नंतर तिर्थयात्रा इ. करतात, मुले – मुली व कुटुंबियाकडे जात असतात.

मात्र रेल्वे भाड्यातील सवलत बंद करून केंद्रातील मोदी सरकारला ‘सर्व सामान्य, गरीब जेष्ठ नागरीकां विषयी’ कणव व सहानूभूती नसल्याचेच सिध्द केले आहे.. त्यामुळे मोदी सरकारचा अमानवी चेहरा पुढे आला असुन काँग्रेस जेष्ठांच्या, अपंगांच्या सवलती बाबत तीव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध (व्हिडिओ)

Posted by - March 26, 2022 0
पुणे- शिवाजीनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नराधम…

जावयाने केले सासऱ्यावर चाकूने सपासप वार, खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद

Posted by - April 21, 2022 0
पुणे- पती-पत्नीच्या वादातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये…

पहिल्याच दिवशी RRR ची रेकॉर्डब्रेक कमाई, मिळवला 18 कोटींचा गल्ला

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- ‘बाहुबली’ फेम एसएस राजामौली यांचा आरआरआर चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडीत…

ब्रेकिंग ! भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा, 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

Posted by - February 4, 2022 0
कणकवली- संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना 18…

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी पीच फळाचे करा नियमित सेवन

Posted by - February 3, 2022 0
कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जीवनसत्त्व आणि फळांचे तसेच भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!