मुळा खा आणि आजारांना दूर ठेवा

82 0

बहुगुणी असूनही मुळा हे एक दुर्लक्षित कंदमूळ आहे. मुळा चवीला तिखट असल्याने अनेक जण मुळ्याचा आहारात समावेश करणं टाळतात. मात्र मुळा खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. मात्र त्याचे सेवन नियमित आणि योग्य प्रमाणात करावे.

जाणून घ्या मुळ्याचे शरीरासाठी होणारे फायदे

कावीळ आजारावर गुणकारी
कावीळ झाल्यास आहारात मुळ्याचा अवश्य समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.

डायबेटिज रुग्णांसाठी लाभदायक
मुळा खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मुळ्याचे सेवन करणे डायबेटिज रुग्णांसाठी लाभदायक आहे.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
मुळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच आहारात मुळ्याचा समावेश केला कॅलरी कमी होण्यासही मदत मिळते. परिणामी वजन कमी होण्यासही मदत होते.

बद्धकोष्ठता आजारावर गुणकारी
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी रोज थोडा मुळा अवश्य खावा. मुळ्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

किडनीस्टोन आजारावर गुणकारी
मुळ्यातील कॅल्शियम ऑक्सालेट हे किडनीस्टोन शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करते.

ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखतो
मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मुळा उपयोगी आहे.

अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयोगी
अशक्तपणा जाणवत असेल तर मुळ्याचे सेवन करावे. मुळ्यामध्ये फॉस्फरस आणि आर्यन असतात. यांमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

भूक वाढण्यास मदत होते
मुळ्याच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळून पिल्यास भूक वाढण्यास मदत.

Share This News

Related Post

संतापलेल्या टेलरनं ग्राहकाच्या पोटात खुपसली कात्री

Posted by - March 19, 2022 0
टेलर आणि त्याच्या ग्राहकात घडलेल्या एका घटनेनं पुणे हादरुन गेलंय. या घटनेत संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच कात्री खुपसली आहे.…

अ‍ॅमेझॉनतर्फे भारतात समर सेलला सुरुवात, ब्रँडेड वस्तूंवर घसघशीत ऑफर

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर समर सेलची सुरुवात झाली आहे. या समर सेलमध्ये वन प्लस, एलजी, इंटेल, टेक्नो, फ्युजिस्तू, रेनी, आणि…

कोरोनाच्या कॉलर ट्यून पासून होणार लवकरच नागरिकांची सुटका

Posted by - March 28, 2022 0
सतत फोनवरून ऐकू येणाऱ्या कोरोना कॉलर ट्यूनला लोकं हैराण झाले आहेत. कोरोना कॉलर ट्यूनमुळे इमरजेंसीच्या काळात फोन करताना वेळ लागत…

अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव- सुबोध गोखले (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022 0
पुणे- अक्षर सुधारण्यासाठी लागते चिकाटी, आवड आणि सातत्याने केलेला सराव असं मत सुप्रसिद्ध सुलेखनकार सुबोध गोखले यांनी व्यक्त केलं. जागतिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!