प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करून दिले राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

71 0

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ४ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत नुकताच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. त्याच व्हिडिओला शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचाच एक व्हिडिओ शेर करून प्रत्युत्तर दिले आहे.

या व्हिडिओमध्ये बाळासाहेब म्हणतात…

‘ मला कोणीतरी माझ्या स्टाइलमध्ये बोलत असल्याचे सांगण्यात आले. तुमचा शैली ठीक आहे, पण तशा पद्धतीची तुमची विचारधारा आहे का? नुसती मराठी-मराठी बोंब मारून चालणार नाही. तुमच्या जन्माआधी मी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा मांडला होता’ हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले की, “हा मूळ व्हिडिओ आहे. हे स्वस्तात नकल करणाऱ्यांसाठी एक धडा आहे. कॉपी करणारे नेहमीच एक पाऊल मागे नसून अनेक पावले मागे असतात.

राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडिओत बाळासाहेब काय म्हणतात ?

राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या 36 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भगवी शाल परिधान केलेले दिसत आहेत आणि त्यांच्या मागे पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत, “ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यातील नमाज थांबवली जातील, कारण धर्म असा असावा की, त्यामुळे देशाच्या विकासात अडथळा येणार नाही. जर आपला हिंदू धर्म अडथळा निर्माण करत असेल तर मला सांगा. मी याकडे लक्ष देईन. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले जातील.

Share This News

Related Post

देशातील पहिली हायड्रोजन कार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लाँच

Posted by - March 19, 2022 0
टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीसह पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून, भारतातील पहिले ऑल-हायड्रोजन इलेक्ट्रिक वाहन मिराई  लाँच…

अकोला जिल्हा न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा

Posted by - April 19, 2022 0
अकोला जिल्हा न्यायालयात बुक बाइंडर पदाची भरती केली जाणार आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.…

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून राजकारण (व्हिडिओ)

Posted by - March 4, 2022 0
सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्गीय आयोगाचा आंतरिम अहवाल फेटाळून लावल्यानंतर आता अर्थसंकल्प अधिवेशनात जोरदार घामासांग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेत…

डायरीतील मातोश्री माहिती नाहीत पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही – चंद्रकांत पाटील

Posted by - March 27, 2022 0
मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!