Breaking ज्या पायरीवर पाडले त्याच पायरीवर किरीट सोमय्या यांचा झाला जंगी सत्कार

88 0

पुणे- पुणे महापालिकेत शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर किरीट सोमय्या ज्या पायरीवर पडले त्याच पायरीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी पुणे महापालिका कार्यालयाबाहेर भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

या सत्काराला पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्याचप्रमाणे महापालिका परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेकडो कार्यकर्ते किरीट सोमय्या यांच्या स्वागतासाठी आले होते. यावेळी गर्दीला नियंत्रण करताना पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी मोठा गोंधळ झाला. किरीट सोमय्या यांचे महापालिका आवारात आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या पायऱ्यांवर आणल्यानंतर या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. आता शिवसेना नेमकी कुठे? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आला.

किरीट सोमय्या म्हणाले, ” पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच आज जो पोलीस बंदोबस्त होता, त्यादिवशी मात्र सर्व पळून गेले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी 100 गुंड पाठवले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच. पवार आणि ठाकरे यांनी पैसे खाल्लेत. संजय राऊतांनी जे पैसे खर्च केलेत त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, त्यांचा आणि पाटकर यांचा संबध काय ते त्यांनी जाहीर करावं. उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. बेनामी कंपनी ही संजय राऊतांची कंपनी आहे. त्या कंपनीला शंभर कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देऊन फसवणूक केली आहे ” असा आरोप त्यांनी केला. किरीट सोमय्या यांच्या खांद्याला खांदा लावून भाजप उभे आहे, असे यावेळी जगदीश मुळीक यांनी सांगितलं.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवरील सत्काराच्या कार्यक्रमावर काँग्रेस आणि शिवसेनेने आक्षेप घेतला होता. या सत्कार कार्यक्रमाला परवानगी देऊन नये असे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले होते. त्यामुळे सत्काराचा कार्यक्रम हा भाजप कार्यालयात करण्याचं ठरलं. पण पुणे महापालिका कार्यालय परिसरात शेकडो कार्यकर्ते किरीट सोमय्या यांच्या स्वागतासाठी आले होते. त्यामुळे सोमय्या यांचा सत्कार त्याच पायरीवर करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला. एकूणच भाजपने करून दाखवले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य :अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधीमंडळ सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी विकासाची पंचसुत्री राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.…

पुण्यातील स्टार्टअप नवउद्योजकांचा विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून सत्कार

Posted by - January 29, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाकडून पुण्यातील राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेल्या स्टार्टअप सुरू करणाऱ्या पाच नवउद्योजकांचा सत्कार करण्यात…

नाना पटोले आणि बच्चू कडू यांचे फोन कोणाच्या नावाने टॅप झाले ? गृहमंत्र्यांनी दिली माहिती

Posted by - February 26, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप…

पुणे महापालिकेतील स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्चला

Posted by - February 18, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत…

ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे पुतना मावशीचे प्रेम- नाना पटोले

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!