रक्तस्त्राव नाही ? मग सोमय्या यांना जखम कशामुळे झाली ? वैद्यकीय अहवाल आला समोर

81 0

मुंबई – किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्या प्रकरणी महत्वाची अपडेट आलेली असून या हल्ल्यामध्ये सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नाही असंही वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोमय्यांच्या व्हिडीओमध्ये दिसत असणारी जखमी खोटी होती का, असा प्रश्न पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

भाजपन नेते किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर भाभा रुग्णालयाचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाली असून जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नाही असंही वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अशी झाली घटना

राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा हल्ला शिवसेनेने केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या Somaiya पोलीस स्टेशनमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवर बाटल्या, चपला आणि दगडफेक करण्यात आली. त्यांच्या गाडीची काच यामुळे फुटली. ज्यामध्ये सोमय्या हे जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. मात्र, सोमय्यांना झालेली जखमी कृत्रिम आहे का, याची चौकशी पोलीस करणार आहेत. दरम्यान, सोमय्या यांच्या चालकाविरोधातही भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस ठाण्यात आलेल्या सोमय्या याच्या चालकाने भरधाव गाडी चालवून दोघांना किरकोळ जखमी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

संजय राऊत म्हणतात, तो तर टोमॅटो सॉस

एक वेडा माणूस ओठाखाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजभवतीची मागणी करत असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या यांचे नाव न घेता लगावला होता.

Share This News

Related Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Posted by - April 13, 2022 0
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात विविध ठिकाणी मोठे मेळावे आणि समारंभ होणार आहेत. त्यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल…

शंभर पेक्षा जास्त जागा जिंकू, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना विश्वास

Posted by - February 1, 2022 0
पुणे- भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढविश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी…

महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर…

पंजाब मध्ये आप आघाडीवर तर गोव्यात सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूनं

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार असून या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत सुरू…

महाराष्ट्र साहित्य परिषदेत नूतनीकरण कामाचा शुभारंभ

Posted by - February 5, 2022 0
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, तळघर आणि कार्यालय आदी कामांच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!