ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या दुकानांमधून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

99 0

पुणे – ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल 25 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी पिंपरी कॅम्प मधील साई चौकातील जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स व लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या दोन दुकानांवर करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी इस्माईल इस्तेखार खान ( वय -26 रा . एसएनबीपी शाळेसमोर मोरवाडी , पिंपरी ) याच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र सोहन सिंग ( वय 36 रा कसबा पेठ , मुळ रा . बिरोलीया , राजस्थान ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एलजीएफ डिफेन्स कंपनीत तपासणी अधिकारी म्हणून काम करतात . कॉपी राईट हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे ते कारवाई करतात. फिर्यादी यांना पिंपरी येथील साई चौकातील दोन दुकानामध्ये सुपरड्राय या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पॅट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादी यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्याकडे तक्रार अर्ज करुन कारवाईची परवानगी मागितली होती.

पोलीस उपायुक्तांनी मान्यता दिल्यानंतर पिंपरी पोलिसांनी फिर्यादी समक्ष या दोन दुकानांवर धाड टाकली. यावेळी जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स या दुकानातून ३१२ बनावट जीन्स तर लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या २०० बनावट जीन्स जप्त करण्यात आल्या. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share This News

Related Post

राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी- चंद्रकांत पाटील

Posted by - April 21, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला…

महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर…

पुणे महापालिकेतील स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्चला

Posted by - February 18, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत…

औरंगाबादमधील ‘त्या’ कीर्तनकारावर कारवाई करा ; तृप्ती देसाई यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Posted by - April 10, 2022 0
औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार महाराज व एक महिला कीर्तनकार यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कीर्तनकारावर कारवाई करण्याची मागणी भूमाता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!