राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती होणार !, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

72 0

मुंबई- पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितले.

Share This News

Related Post

औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या कुरियरद्वारे तलवारी; दोन तलवारी जप्त (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
पुणे- औरंगाबाद शहरामध्ये एकाचवेळी कुरियरने तब्बल 37 तलवारी आल्याची घटना घडलेली असतानाच पुण्यातही कुरिअरद्वारे दोन धारदार तलवारी आल्या. या घटनेने…

पहिल्या भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Posted by - April 24, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दौऱ्यावर येत असेल भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी मुंबईत आले आहेत या सोहळ्यासाठी…

हवेलीत छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभारणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Posted by - March 11, 2022 0
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत असून उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे पुण्यातील हवेली या ठिकाणी…

सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

Posted by - March 25, 2022 0
पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची नवनियुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!