भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

103 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत त्यांनी चक्क राज्यपालांची तक्रार थेट मोदींनाच केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीसांच्या नंतर अजित पवार यांनी जनतेला संबोधन केलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आठ दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱ्यात “चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है”, असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावरून विरोध करण्यात आला.

‘मला पंतप्रधान यांना लक्षात आणून द्यायचं आहे की, काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे. शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा मोठा वारसा आहे, त्याचे पालन केले पाहिजे. तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे. याबद्दल मनात आकस न ठेवता वारसा पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भर सभेत तक्रार केली.

https://youtu.be/bMxGXw43H2g

Share This News

Related Post

कोणत्या नेत्यावर संजय राऊत डागणार तोफ ; संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

Posted by - March 7, 2022 0
शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत उद्या मंगळवारी (दि.8 मार्च) दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून…

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक (व्हिडिओ)

Posted by - January 29, 2022 0
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने…

मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार, ठाकरे सरकारला घेरण्याची भाजपाची रणनीती

Posted by - March 2, 2022 0
मुंबई- दाऊदशी व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी…

इतर मागास वर्गीय समाजावरील अन्यायाविरुद्ध पेटून उठा – नाना पटोले

Posted by - March 29, 2022 0
इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन…

दिल्लीतील कामगिरीमुळे ‘आप’ चा पंजाबमध्ये विजय – शरद पवार

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!